Pune News : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेसात लाख रुपयांची फसवणूक

महिला पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका महिलेची पुणे पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिला पोलिसाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेसात लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदिती उर्फ विद्या दिपक साळवे (रा. खडकी बाजार, पोलीस वसाहत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आदिती साळवे या हडपसर पोलिस ठाण्यात महिला शिपाई म्हणून नेमणुकीस आहेत. याप्रकरणी सुवर्ण विठ्ठल येनपुरे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आदिती साळवे हिने फिर्यादीची लहान बहीण आणि मावस बहिण यांना पुढे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यासाठी तिने फिर्यादी कडून साडेसात लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ही तिने नोकरी लावली नाही. दरम्यान नोकरी लागत नसल्यामुळे फिर्यादीने आपण दिलेले पैसे परत मागितले.

पैशाचा तगादा सुरू असल्यामुळे आदिती साळवे ने तीन लाख रुपये परत दिले परंतु उर्वरित साडेचार लाख रुपये अद्याप परत न देता आर्थिक फसवणूक केली आहे. तक्रार आल्यानंतर खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.