Crime News : दहा रुपयांच्या कारणावरून हॉटेल मालक आणि वेटरची ग्राहकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : हॉटेल मालक आणि वेटरने दहा रुपयांच्या कारणावरून ग्राहकाला लाकडी स्टम्पने बेदम मारहाण केल्याचा प्रकार भवानी पेठेतील एका हॉटेलमध्ये घडला. समर्थ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. 

हॉटेल मालक रमेश गोविंद संगम (वय 57) आणि वेटर निकम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मारुती गायकवाड (वय 42) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी शुक्रवारी रात्री भवानी पेठेतील हॉटेल संगम या ठिकाणी गेले होते. यावेळी त्यांनी हॉटेल मालक आणि वेटर यांच्याकडे दारूचे आगाऊ घेतलेले दहा रुपये परत मागितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी संगणमत करत फिर्यादीला शिवीगाळ करून धमकी दिली आणि लाकडी स्टंपने त्यांच्या दोन्ही हातावर व डोक्यावर मारून जबर दुखापत केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत हॉटेल मालकाला अटक केली आहे. समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.