Pune Crime News : पतीनेच व्हायरल केले पत्नीचे अश्लील फोटो, कारण….

एमपीसी न्यूज : पैशाच्या कारणावरून पतीनेच पत्नीचे अश्लील फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पतीसह सासू सासरे यांच्याविरोधात चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 33 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी, पुण्यातील औंध परिसरात हे पती-पत्नी राहतात. पतीसह सासू सासरे यांनी वेळोवेळी फिर्यादीकडे पैशाच्या कारणावरून वाद घालत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तर आरोपी पतीने फिर्यादीचे बाथरूममधील, कपडे बदलतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीच्या मित्र-मैत्रिणींना दाखवून  बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.