India Corona Update: चोवीस तासांत देशात 27,409 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 347 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 409 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 2.23 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 92 हजार 943 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 17 लाख 60 हजार 458 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. चोवीस तासांत 82 हजार 817 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.82 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 4 लाख 23 हजार 127 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजवर 5 लाख 09 हजार 358 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 75.30 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 12.29 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 173.42 कोटी जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.