India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 34,973 तर, केरळमध्ये 26,200 नवे कोरोना रुग्ण  

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 34 हजार 973 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 37 हजार 681 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. केरळमध्ये चोवीस तासांत 26 हजार 200 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, 114 रुग्ण दगावले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 31 लाख 74 हजार 954 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 23 लाख 42 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.49 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 3 लाख 90 हजार 646 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 260 रुग्ण दगावले आहेत, भारतात आजवर 4 लाख 42 हजार 009 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 53 कोटी 86 लाख 04 हजार 854 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 87 हजार 611 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात 72 कोटी 37 लाख 84 हजार 586 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.