Anil Ambani : अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस;420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप

एमपीसी न्यूज – प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट आले आहे. अंबानी यांनी स्विस बॅंकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर त्यांनी 420 कोटींचा कर चुकविल्याचा आरोप आहे.याबद्दल आयकर विभागाने त्यांनी नोटीस पाठविली आहे. तसेच 31ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.

अनिल अंबानी यांनी 814 कोटी रुपयांची मालमत्ता लपविल्याचा आरोप आहे. दोन परदेशी बॅंकांमध्ये त्यांनी हे पैसे ठेवले असून या रकमेवरचा 420 कोटींचा कर चुकविला आहे, असा आरोप आयकर विभागाने केला आहे. ही रक्कम काळा पैसा असल्याचे आयकर विभागाने सांगितले.

अंबानी यांचे बहामास इथल्या इकार्ट डायमंड ट्रस्ट आणि एका व्यापारी संघटनेशी संबंधित आहेत. या कंपन्यांमधून आलेली रक्कम अनंत अंबानींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.