Pimpri News : सावरकरप्रेमी साहित्यिकांचे अंदमानला प्रयाण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी गुरुवारी (दि.10) अंदमानसाठी प्रयाण केले. साहित्यप्रेमी अनिकेत गुहे यांनी या खास सहलीचे आयोजन केले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, माधुरी ओक, प्रदीप गांधलीकर, राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, एकनाथ उगले, रजनी अहेरराव, राजेश पगारे, उज्ज्वला केळकर आदी साहित्यिक आणि रंगकर्मीं या सहलीत सहभागी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस आणि शहरातील रसिकांनी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात साहित्यिकांच्या समूहाला निरोप दिला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सिद्धहस्त साहित्यिक सुद्धा होते. त्यामुळे त्यांच्याविषयी साहित्यिकांच्या मनांत आदराची भावना असते, याच भावनेतून अंदमान सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विनी कुलकर्णी, शरद काणेकर, अंजू सोनवणे, यशोदा पाटील, अनिल धोपाडे यांनी संयोजनात सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.