India Corona Update : 24 तासांत वीस हजाराहून कमी कोरोना रुग्ण, 206 दिवसातील निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 19 हजार 740 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 2 लाख 36 हजार 643 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 206 दिवसातील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 39 लाख 35 हजार 309 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 32 लाख 48 हजार 291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 23 हजार 070 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मागील 24 तासांत देशात 248 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 50 हजार 375 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.97 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 58 कोटी 13 लाख 12 हजार 481 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 12 लाख 69 हजार 291 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 93 कोटी 99 लाख 15 हजार 323 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 79 लाख 12 हजार 202 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.