Maharashtra New Corona Guidelines : दिलासादायक! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यांत पूर्ण अनलाॅक प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संकट काहीसे ओसरल्यामुळे राज्यसरकारकडून राज्यातील 14 जिल्ह्यांसाठी अनलाॅकबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यातील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 14 जिल्ह्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत, तर इतर जिल्ह्यांत ५० टक्के क्षमतेने या सुविधा सुरू राहणार आहेत. राज्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

कोणत्या जिल्ह्यांसाठी नवी नियमावली जाहीर?

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • पुणे
  • भंडारा
  • सिंधुदुर्ग
  • नागपूर
  • रायगड
  • वर्धा
  • रत्नागिरी
  • सातारा
  • सांगली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • कोल्हापूर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.