Pune News : पुण्यातील जगधने टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज बिबेवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत (Pune News) पसरवणाऱ्या सराईत टोळी प्रमुख योगेश जगधने व त्याच्या तीन साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख योगेश रमेश जगधने (वय 26 रा. बिबेवाडी) व त्याचे साथीदार उमेश रमेश जगधने (वय 31) व विकास उर्फ सोन्या गंगाराम राठोड (वय 23) व एक विधीसंघर्षीत बालक (सर्व राहणार बिबेवाडी) बिबेवाडी पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Alandi News : आळंदी मधील स्वच्छतागृहाला समाजकंटकाने लावली आग

जगधने हा सराईत असून परिसरात दहशत पसरविण्यासाठी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, अवैध मार्गाने कामे करणे, खुनाचा प्रयत्न, ठार मारण्याची धमकी देणे, (Pune News) शस्त्राच्या धाकाने चोरी करणे, दरोडो घालणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली तरी आरोपी यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अखेर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

सध्या तीन आरोपी हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून 1 जण अल्पवयीन आहे.याचा पुढील तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे या करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.