Pune News : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून

एमपीसी न्यूज : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा खून केला. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेच्या मैदानावर मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. राजन (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भिंतीवर लावण्यात आलेला आग विझविण्याचा लोखंडी डब्बा घालून खून करण्यात आला. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील एका शाळेच्या मैदानात मंगळवारी मध्यरात्री मयत राजन आणि त्याचा मित्र दारू पीत बसले होते. यावेळी दारू पीत असताना त्यांच्यात काही वाद झाले. आणि या वादाच्या रागातून राजन यांच्या डोक्यात लोखंडी डबा घालून खून करण्यात आला.

दरम्यान बुधवारी सकाळी शाळेच्या मैदानावर मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a85abeac7b61bc',t:'MTcxNDE1MzE5Mi41ODgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();