Chikhali Crime News : फरशीवर सिमेंट पडत असल्याने महिलांमध्ये वाद, हातपाय मोडण्याची दिली धमकी 

एमपीसी न्यूज – फरशीला सिमेंट पडत असल्याने दोन महिलांमध्ये वाद झाला. यामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेला शिवीगाळ करत, चावा घेतला तसेच मंगळसूत्र तोडून हातपाय मोडण्याची धमकी दिली. नेवाळे वस्ती, चिखली याठिकाणी मंगळवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार घडला. 

याप्रकरणी मनिषा गोवर्धन भाकरे (वय 36, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि.1) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आशा संजय शेंडगे (वय 41, रा. नेवाळे वस्ती, चिखली)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला त्यांच्या घरासमोर असलेल्या फरशीला सिमेंट लावत होती. त्यावेळी सिमेंट फिर्यादी महिला यांच्या घरातील फरशीवर येत होते. सिमेंट लावू नको असे फिर्यादी महिलेनं आरोपी महिलेला सांगितले त्यावरून आरोपी महिला त्यांच्या अंगावर धावून गेली व मारहाण केली. तसेच, हाताला चावा घेऊन गळ्यातील मंगळसूत्र तोडून, ‘माझ्या नादी लागलीस तर हातपाय मोडून काढीण,’ अशी धमकी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.