NCP : राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टीच्या उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, फजल शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

गायकवाड यांच्यासोबत (NCP) सरचिटणीस पदी उत्तम धनवटे, उपाध्यक्ष पदी प्रशांत देवकाते यांची फेरनिवड केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.