Talegaon Dabhade News : अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन कार्याची आवश्यकता – डॉ. हरी शंकर

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

एमपीसी न्यूज – ‘अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन कार्याची मोठी आवश्यकता आहे. अभियांत्रिकी मधील तंत्रज्ञान आणि त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते, त्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, तांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ  यांनी कृतिशील राहणे आवश्यक असल्याचे मत हिमालयन विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. हरी शंकर यांनी व्यक्त केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये ‘अभियांत्रिकीमधील तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापन’ (आयसीएईटीबीएम २०२२) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाईन माध्यमातून पार पडली. यामध्ये कॅनडा, थायलंड आदी देशातील  प्रतिनिधींचे प्रबंध सादर करण्यात आले.

या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी हिमालयन विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. हरि शंकर, जीआरसीएफचे डॉ. प्रकाश दिवाकरण,  संस्थचे विश्वस्त राजेश म्हस्के, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वाधवा, डॉ. विलास देवतारे, डॉ. नितीन धवस उपस्थित होते.

Watch on Youtube: ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

 परिषदचे मुख्य वक्ते  एशिया पॅसिपिक  आंतरराष्ट्रीय विद्यापीठ थायलंडचे  डॉ. नोहा ए बलराज, रोम विद्यापिठ टॉर व्हॅगेरा इटलीचे प्रा. डोनेटो, युनिव्हर्सिटी अरकंझा यू.एस चे डॉ. शेषाद्री मोहन, कॅनडाचे मनोज जैन यांनी तंत्रज्ञानातील विविध संशोधन क्षेत्रातील विषयांवर मार्गदर्शन केले.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क – स्मिता करंदीकर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेच्या संयोजिका डॉ. गायत्री आंबेडकर यांनी केले तर डॉ. नितीन धवस  यांनी आभार मानले.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.