Omicron News: शहरात ‘ओमायक्रॉन’चा आणखी एक नवीन रुग्ण; 62 पैकी 59 रुग्ण संसर्गमुक्त, 3 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले आणखी एक नवीन रुग्ण आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आढळला. रुग्णाचा रँन्डम तपासणीत ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ओमायक्रॉनच्या आजपर्यंतच्या 62 रुग्णांपैकी 59 रुग्ण संसर्गमुक्त झाले. 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.

आज शहरात ओमायक्रॉनचे आणखी एक नवीन रुग्ण आढळला. रँन्डम तपासणीत ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परदेशातून आलेल्या 72 कोरोना बाधित रुग्णांची पुन्हा 10 व्या दिवशी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

59 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त; 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1901 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1854 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 60 तर त्यांच्या संपर्कातील 35 जण पॉझिटीव्ह आले. तर, 1759 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 60 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 31 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. संपर्कातील 35 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 16 ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 15 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले आहेत. 59 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत. तर, 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.