Chikhali News : महाशिवरात्रीला मंदिरात निघालेल्या महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असेलल्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री पावणे आठ वाजता शाहूनगर येथे घडली.

शीतल हणमंत नेवाळे (वय 39, रा. नेवाळे मळा, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त फिर्यादी आणि त्यांच्या जाऊ तृप्ती नेवाळे महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी केटीएम कंपनीच्या दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.