Dighi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली.

विशाल किसन रिंढे (वय 32, रा. समर्थ सिटी फ्लॅट नंबर 106 सिंहगड रोड किरकिट वाडी, खडकवासला, हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी  पथकातील पोलीस हवालदार निशांत काळे, मावस्कर, पोलीस शिपाई सुधीर डोळस, गायकवाड हे पिंपरी चिंचवड आयुक्तलयाच्या हद्दीत गस्त करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार निशांत काळे व पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, विशाल रिंढे हा दिघी परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरत आहे.

त्यानुसार पोलिसांनी दिघी परिसरात सापळा लावला. विशाल रिंढे हा हॉटेल गाथा स्नॅक्स सेंटर देहू फाटा या ठिकाणी मिळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व जिवंत राउंड मिळून आले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन, त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा 3(25) प्रमाणे दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.