Talegaon News : विक्रीसाठी मेफेड्रोन जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

32 लाखाचा मुद्देमाल जप्त  

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी मेफेड्रोन जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली असून, तब्बल 32 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.05) भंडाराडोंगराकडे जाणा-या तुकाराम महाराज कमानी जवळ रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.

नदीम इनायत पटेल (वय 33, रा. मुंब्रा, ठाणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नामदेव खेमा वडेकर यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यात 27 लाख 20 हजार रूपये किंमतीचा 272 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून MH 04 KL 8762 ही चारचाकी, दोन मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ असा एकूण 32 लाख 61 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.