Dehuroad Crime News : धक्कादायक ! घोरावडेश्वर डोंगरावर महिलेचा खून

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर एका तरूणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 20) पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिताली सोमनाथ धडस (वय 20, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मिताली धडस रविवार (दि. 19) पासून बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी पोलिसांत धाव घेतली आणि मितालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, बेपत्ता मितालीचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेहच घोरावडेश्वर डोंगराच्या वरच्या बाजूस आढळून आला.

याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्यानेच हा खून केला असल्याची कबुली त्या तरुणाने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी हत्येबद्दल उलगडा करताना म्हटले, आरोपीने मितालीचा सुरुवातीला ओढणीने गळा आवळला, त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा निर्घृणपणे खून केला.

देहूरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून देहूरोड पोलीस अधिक याबाबत तपास करीत आहे.

दरम्यान, या याऱ्या प्रकरणाला प्रेमाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रेम संबंधातून खून झाला असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र याला पोलिसांनी याला अजूनही पुष्टी दिली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.