Pune Crime News : धक्कादायक! ज्याच्या सोबत बसून दारू प्यायली त्यालाच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – ज्याच्या सोबत बसून दारू प्यायली त्याच्याच डोक्यात सिंमेटचा ब्लॉक घालून जखमी केले व नंतर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी मध्यरात्री धनकवडी स्मशानभूमी आवारात हा प्रकार घडला.

सुरज मरळ (वय 28, रा. धनकवडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. मरळ यांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक जणांविरोधात 307, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मरळ यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाचे पैसे गोळा करत असताना मरळ यांची आरोपी सोबत ओळख झाली. रविवारी मध्यरात्री दोघेजण एकत्र बसून दारू प्यायले. दारूच्या नशेत आरोपीने मरळ यांच्या डोक्यात सिंमेटचा ब्लॉक घालून जखमी केले व नंतर पेट्रोल टाकून पेटलेली काडेपेटी अंगावर vटाकून जाळण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.