Wakad Crime News : केश कर्तनालयात चोरी; 69 हजारांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज – काळाखडक, वाकड येथे एका केश कर्तनालयात एका चोरट्याने चोरी केली. दुकानातून 69 हजारांचे साहित्य चोरट्याने चोरून नेले आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे घडली.

मोहम्मद सईद जुबेर शेख (वय 43, रा. काळाखडक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलराम शर्मा (वय अंदाजे 23) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काळाखडक येथे मॅट्रिक सलून नावाचे केश कर्तनालय आहे. त्या दुकानात आरोपी बलराम हा काम करत होता. त्याने लबाडीच्या इराद्याने केस कापण्याच्या मशीन, रोख रक्कम असा एकूण 69 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.