Pimpri Corona Update : रविवारी शहरात 4376 नवीन रुग्ण; 2623 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 23) दिवसभरात 4376 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 2623 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 27 हजार 550 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 96 हजार 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 27 हजार 588 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 27 हजार 2 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 586 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 9 हजार 331 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 32 लाख 26 हजार 585 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.