Pimpri Crime : पिंपरीत प्रवासी बसविण्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षात प्रवासी (Pimpri Crime) बसविण्याच्या कारणावरून चार रिक्षा चालकांनी एका रिक्षा चालकाला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री वायसीएम हॉस्पिटल समोर पिंपरी येथे घडली.

सिकंदर पंढरीलाल यादव (वय 34, रा. एमआयडीसी भोसरी), संदीप पंढरीलाल यादव (वय 25) अशी जखमींची नावे आहेत. सिकंदर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज खंडेतोड (वय 25, रा.घरकुल चिखली), भास्कर कदम, अतुल (पूर्ण नाव माहिती नाही), दगडी अण्णा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan theft: ज्वेलर्सच्या दुकानातून चांदीच्या वस्तू चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी शीफ्टने रिक्षा चालवण्याचे काम करतात. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी वायसीएम हॉस्पिटल समोरून प्रवासी रिक्षात बसवत असताना त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. त्यातून (Pimpri Crime) आरोपींची शिवीगाळ करत फिर्यादीस मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ संदीप यादव आला असता आरोपींनी त्याला ही सिमेंटच्या ब्लॉकने आणि बांबूने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.