Pimpri Crime News : पिंपरी, निगडी, सांगवी, दिघी येथे चार चोऱ्या; दोन वाहनांसह सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी, निगडी, सांगवी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यामध्ये एक दुचाकी, एक जीप, मोबाईल फोन आणि इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिद्धेश्वर प्रताप शेटकार (वय 26, रा. भोसरी आळंदी रोड, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहननगर येथील केएसबी चौकातून फिर्यादी यांची 45 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.

गोरखाराम पुनमाराम चौधरी (वय 42, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांची पाच लाख रुपये किमतीची बोलेरो जीप अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरापासून चोरून नेली आहे.

गौरव गिरीश कोठारी (वय 24, रा. औंध, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशालनगर पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून फिर्यादी यांची बॅग अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. त्यामध्ये एक मोबाईल फोन, एक एअरपॉड, पाकीट, डेबिट कार्ड असे आठ हजार 200 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

संदीप वसंत असवले (वय 31, रा. च-होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी 40 हजारांचा आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.