Pimpri : राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या खजिनदाराला 16 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी अटक
एमपीसी न्यूज – राष्ट्रीय श्रमिक आघाडी या नामांकित कामगार संघटनेच्या (Pimpri) खजिनदाराने संघटनेच्या खात्यातून 16 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा सारा प्रकार सप्टेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2023 पिंपरीतील संघटनेच्या कार्यालयात झाला.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरून हेमंत विलास माने (वय 25 रा. मुळ सातारा) याला अटक केली आहे.
Pune : अमित ठाकरे यांच्या बैठकीत लोकसभेसाठी वसंत मोरे यांच्या नावावर चर्चा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या (Pimpri) पिंपरीतील कार्यालयात माने हा खजिनदार पदावर काम करत होता. त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करत संघटनेच्या बँक खात्यातून मागील वर्षभरापासून तब्बल 16 लाख 8 हजार 19 रुपये परस्पर स्वतःच्या व इतरांच्या खात्यावर पाठवून संघटनेची फसवणूक केली. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.