PMC News : नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील (PMC News) अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पुणेकर नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पुणे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसने पोलिसांकडे केली. याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे, प्रदेश सोशल मीडिया काँग्रेस सचिव विशाल गुंड, जतिन परदेशी, युवक काँग्रेसचे प्रणव नामेकर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिकेच्या वतीने पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्मार्ट सिटी, मोबाईल कंपनी व इतर बाबत शहरात सर्वत्र रस्ते खोदाई करण्यात आली. ही खोदाई बुजवताना पुणे महापालिकेच्या ठेकेदारांकडून निकृष्ट, दर्जाहीन काम होत असल्याबाबत महापालिका आयुक्तांना सांगितले होते. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या निकृष्ट कामामुळेच आता संपूर्ण शहर खड्डेमय व चिखलमय झाले आहे.

Pimpri News : रुग्णालयातील दरवाढ मागे घ्या; राष्ट्रवादी, काँग्रेससह सामाजिक संघटनांची मागणी

यामुळे नागिरकांना (PMC News) प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यामुळे नागरिकांना पाठीचे व इतर आजार झाले आहे. महापालिका प्रशासन यांच्यामुळे नागरिकांचे छोटे मोठे अपघात घडत आहे. यातून कुठल्याही नागरिकाच्या जीवाला काही झाल्यास याला सर्वस्वी पुणे महापालिका अधिकारी, संबंधित ठेकेदार आयुक्त जबाबदार राहतील. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.