Talawade News : फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत, चालकाला मारहाण करून जबरदस्तीने चोरली कार  

एमपीसी न्यूज – श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून जबरदस्तीने कार चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 डिसेंबर 2021 रोजी तळवडे येथे हा प्रकार घडला. 

सतीश पद्माकर खराटे (वय 35, रा. रुपीनगर, चिखली, मुळगाव मातोळा, बुलढाणा) यांनी याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.05) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 392, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराटे चाकण येथून परत येत असताना, तळवडे येथे त्यांच्या कारला तीन अज्ञात इसमानी दुचाकी आडवी लागून अडवले. आरोपी यांनी ते श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दाखवली. फिर्यादी यांना जबरदस्तीने कारच्या बाहेर ओढून शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी यांची तीन लाख किंमतीची टोयोटा इटीयोस (एम एच 28 आर 3496) ही कार चोरुन घेऊन गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.