Kasarwadi News : कासारवाडीतील ज्येष्ठ महिलांचा आज गौरव

एमपीसी न्यूज – कासारवाडी सिटीझन फोरमतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कासारवाडीत 50 वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्यास असेल्याला महिलांचा आज (रविवारी) सत्कार करण्यात येणार आहे.

कासारवाडीतील अशोका हॉटेल येथे रविवारी दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महापौर उषा ढोरे, माजी महापौर योगेश बहल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोरोना योद्धा, दहावीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जाणार आहे.

या महिलांनी कासारवाडीची संस्कृती जतन केली. आजपर्यंतचे आयुष्य या परिसरात घालविले. नवीन पिढी घडविली. सर्वांसमोर आदर्श ठेवला. त्यामुळे या महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे फोरमचे समन्वयक मनोज मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.