Pune Crime : दारू पिऊन शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीने जबरदस्ती करत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. (Pune Crime) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गावात ही घटना घडली. हनुमंतराव फरांडे (वय 48) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 23 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Alandi News : मकरसंक्रांती निमित्त माऊली मंदिरामध्ये हजारो महिला भाविकांची गर्दी

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि आरोपी एकमेकांची शेजारी आहेत. 31 डिसेंबर रोजी फिर्यादी महिलेचे पती बाहेरगावी असल्याने आरोपी दारूच्या नशेत त्यांच्या घरी आला. घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून दरवाजा उघडण्यास त्याने भाग पाडले. (Pune Crime) त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करत खाली पाडून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने संभोग केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.