Sangavi News : धक्कादायक ! कैचीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

एमपीसी न्यूज – कैचीचा धाक दाखवून आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (दि.03) सायंकाळी 4.45 वा सांगवी परिसरात मुलीच्या घरी ही घटना घडली. 

याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी (दि.13) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 14 वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 506 (2), 452, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत बाल लैंगिक आत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना तिला कैचीचा धाक दाखवला. तसेच, फिर्यादी व त्यांचे पती यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.