Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी साहेबराव कारके  

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी  काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी साहेबराव नारायण कारके यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,आमदार सुनील शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष दिपक हुलांवळे,नगराध्यक्ष मयुर ढोरे, आदींच्या हस्ते साहेबराव कारके यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

माजी मंत्री मदन बाफना व राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांचा वडगाव मावळ येथील अभिष्टचिंतन सोहळा व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या सत्कार समारंभात कारके यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

कारके यांनी उर्से ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणूनही यशस्वी कारभार सांभाळला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत तर शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नासंदर्भात विशेष प्रयत्नशील असतात मावळ पंचायत समितीचे विद्यमान सदस्य असून गटनेते पदाची धुराही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

आपली राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक, सहकार,कामगार व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

कारके यांच्या निवडीने तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.