Sidhu Moose Wala Death Update : वडिलांच्या मृत्यूनंतर संतोष गुन्हेगार बनला; सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील आरोपीच्या आईला अश्रू अनावर

एमपीसी न्यूज – पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Death) याचा काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्याच्यावर गोळ्या झाडणार्‍या आठ जणांपैकी दोन आरोपी हे पुणे जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातील एक नाव म्हणजे संतोष जाधव. संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्यातील आहे. संतोष हा सराईत गुन्हेगार आहे. मंचर पोलीस ठाण्यात त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत, तर एका खुनाच्या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला आहे. तेव्हापासून संतोष जाधव फरार आहे. दरम्यान सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात (Sidhu Moose Wala Death) त्याच नाव आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून त्याच्या आईने देखील याप्रकरणी समोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, संतोष माझा मोठा मुलगा आहे. दीड वर्षांपूर्वी माझी आणि त्याची शेवटची भेट झाली होती. सुरूवातीला संतोषचा स्वभाव चांगला होता. परंतु दहा वर्षांपूर्वी त्याचे वडील वारले आणि त्यानंतर तो बिघडत गेला. बाहेर मित्रांसोबत राहणे, मारामाऱ्या करणे अशा अनेक प्रकार त्याच्यासोबत घडत गेले. तो घरात आमच्या सोबत कधी राहिलाच नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने कधीच आमचा विचार सुद्धा केला नाही.

Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार, वसंत मोरे यांच्या कट्टर समर्थकाचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

प्रत्येक मुलाकडून आई-वडिलांच्या काहीतरी अपेक्षा असतात, तशाच अपेक्षा आमच्या देखील होत्या. त्याने एक चांगला माणूस म्हणून आयुष्य जगावं असा आम्हालाही वाटायचं. त्यांने कुठेतरी नोकरी करावी पैसे कमवावे आणि सोबत राहावे हीच आमची अपेक्षा होती. परंतु या अपेक्षा काही पूर्ण झाले नाही. आधी तो खूप चांगला होता; परंतु मित्रांच्या संगतीने तो बिघडला. आम्ही त्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.