Pune News : ‘आपुन ईधर का मलंग भाई’ म्हणत तरुणावर लोखंडी रॉडने वार

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सहा जणांच्या टोळक्याने एका 19 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी वीरू हरिदास केंगार (वय 19) यांनी फिर्याद दिली आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी मलंग शहजाद मेहबूब आणि त्याच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री फिर्यादी महादेववाडी येथून जात असताना आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली यांनी आरोपी मलंग याने ‘ मै इधर का भाई है, मलंग भाई, तू मेरे दोस्त को मारा ना, अभी तेरे को मैं खल्लास करता तू देख’ असे म्हणत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या हातावर पायावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्या जवळील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.