Talegaon News : पोत्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. 24) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह एका पोत्यात आढळला असल्याने खुनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तारा नईम शेख (वय अंदाजे 35, रा. टकले वस्ती, निलया कॉम्प्लेक्स जवळ तळेगाव दाभाडे) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील तळ्याजवळ गुरुवारी सकाळी तारा शेख या महिलेचा मृतदेह आढळला. तो मृतदेह पोत्यात होता. तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.