Ramesh Latke : शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे  ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. आमदार रमेश लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचं पार्थिव मुंबईत आणण्यासाठी तायरी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.

आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते.

सलग दोन टर्म रमेश लटके (Ramesh Latke) हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.

MLA Ramesh Latke : एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.