Pune News : धक्कादायक ! धनकवडीतील स्मशानभूमीत कापड व्यावसायिकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीत एका कापड व्यावसायिकाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं ‘स्वर्ग सुख’! पिंपरी-फुगेवाडी मेट्रो प्रवास.. Day 2 | Ground Report व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

सुरज विजय मरळ (वय 28) असे जखमी झालेल्या कापड व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरज मरळ आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. ते घरातूनच हा व्यवसाय चालवतात. दरम्यान रविवारी रात्री ते व्यवसायातून मिळालेले पैसे गोळा करत होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्यानंतर दोघांनीही एके ठिकाणी जाऊन दारू पिली. नंतर गप्पा मारण्यासाठी धनकवडी येथील स्मशानभूमीत जाऊन बसले होते.

 एमपीसी न्यूज पॉ़डकास्ट… पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

गप्पा मारत असतानाच दारूच्या नशेत दोघांचे भांडण झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत जवळच पडलेला सिमेंटचा ब्लॉक त्यांच्या डोक्यात मारला. त्यानंतर सूरज यांनी वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेले पेट्रोल आरोपीने त्यांच्या अंगावर उठून पेटवून देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.