Pimpri News : महापालिका कर्मचा-यांनी आपली जबाबदारी सांभाळून स्वच्छतेच्या “वारीत” सहभागी व्हावे

आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे. आपल्याला नेमून दिलेले काम सरकार कर्मचारी म्हणून न करता जबाबदारीने केल्यास पिंपरी चिंचवड शहर हे देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकावर असेल, त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक कर्मचा-यांनी आपली जबाबदारी सांभाळून स्वच्छतेच्या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

ऑटो क्लस्टर येथे सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2022 पूर्व तयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, नोडल अध‍िकारी, क्षेत्रीय अध‍िकारी, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, मुख्य आरोग्य वैद्यकीय अध‍िकारी डॉ. अनिल रॉय, उपायुक्त संदीप खोत, सहशहर अभ‍ियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त् विनोद जळक, क्षेत्रीय अध‍िकारी शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, रविकिरण घोळके, विजयकुमार थोरात यांच्यासह अध‍िकारी उपस्थ‍ित होते.

महापालिकेच्या प्रत्येक कर्मचा-याला शहराचा अभ‍िमान असायला हवा. शहर प्रथम क्रमांकावर कसे येईल, यासाठी सर्वांनी योजना आखायला हवी. गेल्या चार महिन्यांपासून शहरात सुरु असलेली स्वच्छता मोहिम प्रभावी ठरत आहे. प्रभागांमध्ये 90 टक्के कचरा विलगीकरण होत असल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांमध्ये बदलाची भावना निर्माण होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील मुददयांवर लक्ष केंद्रीत करून प्रत्येकाने कामाला लागायला हवे. कामचुकारपणा होणार नाही याची दक्षता घेवून सुजान नागरीक म्हणून आपली ओळख निर्माण करा, असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

प्रसंगी, स्वच्छ सर्वेक्षणासाठी उत्तम कामगीरी केल्याबददल स्वच्छता निरीक्षक, मुकादम व आरोग्य् कर्मचारी तसेच दोन महिला कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.  तत्पूर्वी, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या पूर्व तयारीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. रॉय यांनी स्वच्छ सर्वेक्षणाचे स्वरुप मांडले. तीन टप्प्यात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज पॉ़डकास्ट… पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

यासाठी 3 हजार गुणांक देण्यात येणार आहे. घरोघरी कचरा संकलन होतो की नाही, घरातील कचरा वर्गीकरण, प्रत्येक वार्डात टीम, कचरा गाडी दररोज येते का, संकलन केलेला कचरा डेपो पर्यंत कसा पोहोचविला जातो, कर्मचारी युनिफार्म, होम कंपोस्टींग, शौचालय स्वच्छता, लोकांची मते, रस्त्यावरील लाईट, झाडे, कंट्रक्शन साईटवर ग्रीन नेट, डिव्हायडर दुरुस्ती यासह अनेक मुददयांवर सेंट्रलची टीम शहरात पाहणी करणार असून महापालिकेच्या कर्मचारी यांनी या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. तसेच, नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करावी, असेही डॉ. रॉय म्हणाले.

प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख‘! पिंपरी-फुगेवाडी मेट्रो प्रवास.. Day 2 | Ground Report व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी मोशी येथे पाच एकर जागेत व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रस्त्यांवर कुठेही राडारोडा दिसणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. संबंध‍ित विकसकांना देखील याबाबत सुचना द्याव्यात. नदी नाल्यात राडारोडा टाकला जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी सांगितले.  आभार संदीप खोत यांनी मानले. मोठया संख्येने अध‍िकारी – कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेकरीता उपस्थ‍ित होते.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.