Pune News : घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसऱ्या लग्नाची घाई महिलेला महागात पडली

एमपीसी न्यूज : घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करणार्‍या महिलेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेसह तिच्या सहा नातेवाईकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. याप्रकरणी एका 31 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि 29 वर्षीय महिलेचा कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित आहे. हा अर्ज प्रलंबित असतानाही आरोपी महिलेने दुसऱ्याच एका व्यक्तीशी बेकायदेशीरपणे विवाह केला.

ही बाब तिच्या घरच्यांना माहिती होती. ते पण तिच्या या कृत्यांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.