India Corona Update : देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या अडीच लाखाच्या खाली, 203 दिवसातील निचांकी 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 18 हजार 833 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, सलग दुसऱ्या दिवशी वीस हजाराहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून ती अडीच लाखाच्या खाली आली आहे. मागील 203 दिवसातील हा निचांक आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 38 लाख 71 हजार 881 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 31 लाख 75 हजार 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 24 हजार 770 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या देशात 2 लाख 46 हजार 687 ॲक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशात 278 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 49 हजार 538 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.94 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 57 कोटी 68 लाख 03 हजार 867 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 09 हजार 825 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 92 कोटी 17 लाख 65 हजार 405 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 59.48 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.