Pimpri New : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – मित्रासोबत दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 3) रात्री बौद्ध नगर पिंपरी येथे घडली.

ऋषिकेश गणेश बालगुडे (वय 21, रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राम (वय 21), कुणाल कदम उर्फ चीक्या (वय 23), दाद्या दीपक कदम (वय 21, सर्व रा. बौद्धनगर, पिंपरी) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी ऋषिकेश त्यांचे मित्र शहाबाज शेख यांच्यासोबत बौद्धनगर पिंपरी येथील एका दुकानात खरेदीसाठी गेले होते. शहाबाज शेख खरेदी करत असताना फिर्यादी दुकाना बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी गणेश राम याने तू माझ्याकडे का पाहत आहेस. मी कोण आहे तुला माहित नाही का, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गणेश राम याने लोखंडी कोयत्याने मारून फिर्यादी ऋषिकेश यांना गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.