Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

27 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सागर विश्वनाथ बुचडे (वय 28, रा. मारुंजी गावठाण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुचडे यांचे मारुंजी येथे ‘हॉटेल समर्थ’ नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा ते बुधवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत आरोपी रितिक याने हॉटेलच्या किचनचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून 31 हजार 800 रुपयांचे नुकसान केले. हॉटेलमधून रितिक याने 27 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.