Pune News : टिकटॉक स्टारची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

0

एमपीसी न्यूज : टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणी कंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीरने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडीयवर समिरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या  आत्महत्येमुळे शहरासह राज्यभरातील चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment