Wadgaon NCP Workers Cell : वडगाव राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्षपदी तुषार वहिले यांची निवड

एमपीसी न्यूज – शिववंदना ग्रुप मावळ तालुका अध्यक्ष व वडगाव मावळ (Wadgaon NCP Workers Cell) येथील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले यांची वडगाव शहर राष्ट्रवादी कामगार सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी सर्व सेलची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तुषार वहिले यांची निवड जाहीर करण्यात आली.
आमदार सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे,युवक तालुका अध्यक्ष किशोर सातकर, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव,दीपक हुलावळे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, कामगार सेल तालुका अध्यक्ष मंगेश राणे आदींच्या उपस्थित तुषार वहिले यांची कामगार सेल वडगावच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी वडगाव हा शहरी भाग (Wadgaon NCP Workers Cell) असून, याठिकाणी जवळच औद्योगिक भाग असल्याने अनेक कामगार वडगाव मध्ये स्थलांतरीत झाले आहेत. त्यांचे मूलभूत प्रश्न राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वहिले यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.