Dehugaon News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) सायंकाळी विठ्ठलवाडी, देहू येथे घडली.

 

रेविकुमार सदयांडी (वय 49) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचे मेहुणे शिबु देवदास (वय 42, रा. पाटील नगर, चिखली) यांनी मंगळवारी (दि. 22) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचे दाजी रेविकुमार हे दुचाकीवरून चिखली ते देहूगाव असा प्रवास करत होते. ते एचपी पेट्रोल पंप, विठ्ठलवाडी याठिकाणी आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

 

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेविकुमार यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.