Kiwale News : 1,500 किलो गोमांस वाहतूक ; एकाला अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – आयशर ट्रकमधून 1,500 किलो गोमांस वाहतूक प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. किवळे येथील बंगलोर पुणे हायवे लगतच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी (दि.12) रात्री 10.15 वा. सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. 

नागनाथ चणाप्पा नागेशी (वय 38, रा. रावेत, मुळगाव – सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे आयशर ट्रकमधून (MH 03 CV 9163) गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा पथकाने किवळे येथील बंगलोर पुणे हायवे लगतच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी (दि.12) रात्री 10.15 वा छापा टाकून एका आरोपीला अटक केली. तसेच, 10 लाख रुपये किंमतीचा आयशर व 3 लाख रुपये किंमतीचे गोमांस असा तेरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.