Burglary in Undri : उंड्रीमध्ये बंद घरात 2 लाखांची घरफोडी;

एमपीसी न्यूज : पुण्यातील हवेली तालुक्यातील उंड्रीमध्ये (Burglary in Undri) दोन लाखांची घरफोडी करण्यात आली आहे. ही घटना 20 मे रोजी रात्री साडेनऊ ते पावणे बाराच्या दरम्यान घडली. 

Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीच्या कंपनीतील मित्राकडून लैगिंक अत्याचार

या प्रकरणी सुमित गावंडे यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी सुमित गावंडे (वय 54 वर्ष) हे उंड्री येथे बंगला नंबर 44 मध्ये राहतात. त्यांचे घर बंद असताना, अज्ञात इसमाने बेडरूमच्या खिडकीचा गज कापून सोने आणि चांदीचा एकूण ऐवज 2 लाख 8 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार केली असून, कोंढावा पोलिस ठाण्यात 488/2022, भादविक 457, 380 अन्वये गुन्हा दाखल (Burglary in Undri) करण्यात आला आहे.

PCMC Election 2022 : शहर विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी, अर्ज करा – ‘आप’चे आवाहन

या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तोरगल करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.