Sangvi Crime News : धक्कादायक! सून आणि नातीचा विनयभंग; 92 वर्षीय सास-यासह दिरावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सून आणि नातीचा विनयभंग केल्या प्रकरणी 92 वर्षीय सासरा आणि 58 वर्षीय दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 ऑक्टोबर 2021 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर दीर आणि सास-याने विवाहितेला आणि तिच्या 29 वर्षीय मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिला आणि त्यांचा जावई यांच्याबाबत दिराने अपशब्द वापरले. महिलेवर नजर ठेवण्यासाठी तिच्या हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवले. दीर आणि सासरा ते सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहतात.

फिर्यादीच्या मुलीसोबत फिर्यादीच्या दिराने गैरवर्तन करून तिला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. मुलीला दिराने मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.