India Corona Update : संसर्गाचा वेग मंदावतोय, सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांच्या आत 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. दररोज नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांच्या आत आली आहे. देशात सध्या 3 लाख 96 हजार 729 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मागील 24 तासांत देशभरात 32 हजार 981 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 लाख 77 हजार 203 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 39 हजार 109 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 91 लाख 39 हजार 901 एवढी झाली आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट 94.45 टक्के एवढा आहे.

 

 

देशात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 573 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी 391 रुग्णांचा मृत्यू मागील 24 तासांत झाला आहे. देशाचा मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 8 लाख 01 हजार 081 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आज घडीला देशात 14 कोटी 77 लाख 87 हजार 656 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे ‌

 

 

देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली व गुजरात या आठ राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांच्या संख्येत निरंतर होणारी घट आणि वाढणारा रिकव्हरी रेट यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.