India Corona Update : चोवीस तासांत देशात 12,428 नवे कोरोना रुग्ण, त्यापैकी 6,664 एकट्या केरळमधील
एमपीसी न्यूज – केरळ वगळता भारतातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 428 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 6 हजार 664 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत. तसेच 24 तासांत देशात 356 रुग्ण दगावले असून त्यापैकी 53 मृत्यू केरळमधील आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 42 लाख 02 हजार 202 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 83 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 15 हजार 951 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.19 टक्के एवढा झाला आहे.
COVID-19 | India reports 12,428 new cases, 356 deaths and 15,951 recoveries in the last 24 hours; Active caseload stands at 1,63,816 pic.twitter.com/KS2NpzFSVf
— ANI (@ANI) October 26, 2021
कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 55 हजार 068 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 63 हजार 816 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 60 कोटी 19 लाख 01 हजार 543 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 31 हजार 826 नमूने गेल्या 24 तासांत तपासण्यात आले आहेत.
COVID-19 Testing Update. For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/3FkOxM81AS
— ICMR (@ICMRDELHI) October 26, 2021