Bhosari: बस मध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भोसरी पीएमटी बस स्टॉप येथून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले चोरून नेले. प्रवास संपल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.